चंद्रपूर :- महाराष्ट्रातील चंद्रपुर जिल्ह्यात आम आदमी पार्टीचा चा वाढता प्रभाव पाहून सर्व स्तरातील नागरिक या पक्षाकडे एक उत्तम ,सुदृढ राजनैतिक पर्याय म्हणून बघत असतांना चंद्रपुरात सुनील रत्नाकर भोयर यांचे नेतृत्वाखाली चंद्रपुर महानगर समिती ने "वॉर्ड चलो" अभियाना अंतर्गत वॉल पेंटिंग तसेच जनसंवाद कार्यक्रम सुरू झालेला असतांना शहरातील पठांनपुरा वॉर्ड येथील महेंद्र कांबळे आणि गंजवार्ड येथील श्री कुणाल कांबळे व्यवसायाने दोघेही ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असलेले दोघांनीही आम आदमी पार्टी च्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच अरविंद केजरीवाल यांना देशाचे प्रधानमंत्री बनविण्यासाठी च्या प्रेरणेने आपल्या अनेक साथीदारांसह पक्षात प्रवेश घेतला. तसेच इंदिरानगर वॉर्ड येथे मागील २०१७ च्या निवडणूकित अपक्ष लढलेले श्री सचिन भालचंद्र मानकर यांना बरीच मते मिळाली होती. आणि श्री रोशन डाखरे ज्यांचे घरी राजनैतिक वारसा आहे. त्यांचे वडिलांनी २०१७ ला निवडणूक लढविली होती त्यांना पण बरीच मते मिळालेली होती. अशा सन्माननीय व्यक्तींनी आम आदमी पार्टीच्या पक्षप्रमुखांच्या, सहसचिवांच्या तसेच सह संयोजकांच्या हस्ते पक्षाची टोपी परिधान करून पक्षप्रवेश केलेला आहे.
पक्षाने श्री महेंद्र कांबळे यांना महानगर क्षेत्राचे SVS-श्रमिक विकास संघटन/ट्रान्सपोर्ट विंग संयोजक तसेच श्री कुणाल कांबळे यांना याच विंग च्या सचिवांची जिम्मेदारी दिलेली आहे. व ती त्यांनी विश्वासाने स्वीकारलेली आहे.
सदर कार्यक्रम पठाणपूरा वॉर्ड मधील निशा अपार्टमेंट येथे पार पडला. या कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हा महानगर समितीचे सहसंयोजक श्री योगेश आपटे, सहसचिव श्री अजयभाऊ डुकरे, झोन संयोजक श्री संदीप तुरक्याल, मायनोरीटी सेल चे श्री आवेजभाई शेख,जेष्ठ कार्यकर्ते श्री रामदासजी पोटे साहेब,श्री युवराज जी राखुनडे, जलनगर वॉर्ड ,श्री श्रावण ईश्वरकर, श्री सचिन भालचंद्र मानकर, श्री रोशन डाखरे , श्री राजेश चेडगूलवार सोशल मिडिया हेड, शाहरुख शेख,सहसंयोजक सिकंदर सांगोरे, बबन कृष्णपल्लीवार, कोषाध्यक्ष अशोक आनंदे, श्री दिलीप तेलंगजी ,श्री वामनराव नांदूरकर, श्री साखरकर जी, सचिव श्री राजू कुडे असे पक्षाचे चंद्रपुर महानगर इंचार्ज तथा संघटनमंत्री श्री सुनील रत्नाकर भोयर यांनी कळविले आहे.
#news34