चंद्रपूर : दिनांक 1 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनची बैठक अनु स्पोकन क्लासेस जेटपुरा गेट इथे संपन्न झाली. सदर बैठक जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांचे नेतृत्वात घेण्यात आली. या बैठकीत सर्व प्रथम नवनिर्वाचित नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून कोचिंग क्लासेस बंद असून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या संचालकांना आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे त्यामुळे शासनाने लवकरच कोचिंग क्लासेस ला परवानगी द्यावी अशी मागणी एकमुखाने या बैठकीत करण्यात आली तसेच कोचिंग क्लासेस संघटन चंद्रपूर जिल्ह्यात बळकट करावे असा ठराव सुद्धा या बैठकीत घेण्यात आला .लवकरच चंद्रपूर जिल्हा कोचिंग क्लासेसचे पदाधिकारी जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हाभर दौरा करतील तसेच नवीन सभासद व्हायचे असल्यास त्यांनी कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष निमेश मानकर सर, उपाध्यक्ष रियासत खान सर सचिव इर्शाद शेख सर ज्येष्ठ मार्गदर्शक नौकरकर सर ,अरविंद बुरांडे सर ,अतुल ठाकरे सर ,रमजान सर मुद्दावार ,शेखर सर, देशपांडे सर पॉल सर ,लोढा सर या सर्वांची उपस्थिती असून यांनी सुद्धा आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले. #news34