चंद्रपूर - सध्या शहरातील बाबूपेठ परिसरात डेंग्यू ची साथ पसरली आहे, वेळेआधी पालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यास वेळ झाला व बाबूपेठ परिसरात डेंग्यू चा उद्रेक झाला.
मात्र नागरिकांनी एकत्र येत पालिकेतील अधिकाऱ्यांची कान उघाडनी केली व परिसरातील नागरिक, महिला, पुरुष व युवक, युवती यांना सोबत घेत, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाला बाबूपेठ येथील प्रसिद्ध डॉ. भाऊराव नक्षणे, बालरोग तज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. सोनाली कपूर, डॉ. सुवर्णा सोंडवले, डॉ. वासनिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
असंख्य महिला पुरुषांनी शिबिरात सहभागी होत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.
150 लहान मुलांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी बाबूपेठ येथील महिला व नागरिकांचे मनापासून आभार मानले, बाबूपेठ परिसरात साथीचे आजार पसरले असता नागरिकांनी न खचता भव्य आरोग्य शिबीर घेतले त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देत आभार मानले.
शिबिराच्या आयोजनात सहभागीचा वाटा उचललेल्या चंदा वैरागडे, महेश म्याकलवार, कार्तिक बल्लावार, उमंग हिवरे स्नेहल अंबागडे, राजु कुळे, विशाल रामगिरवार, प्रदीप खनके, रुपाली बुटले, सुशांत धकाते, सुरेखा बुटले, सुरज बीटे आदींची उपस्थिती होती.