चंद्रपूर : काँग्रेस पक्षाने लोकसभा, विधानसभा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहे. गडचांदूर नगरपरिषदही काँग्रेस पक्षाने काबीज केले आहे. आगामी काळात जिल्ह्यात चंद्रपूर महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्यांनी उमेदवार म्हणून लढल्यास विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम हॉटेल एनडी येथे पार पडला. यावेळी खासदार धानोरकर बोलत होते. यावेळी आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, नगरसेविका सुनीता लोढिया यांची उपस्थिती होती.
खासदार धानोरकर पुढे म्हणाले, रामू तिवारी यांनी सर्वांना सामावून घेणारी कार्यकारिणी तयार केली आहे. पक्ष मोठा झाल्यास आपण मोठे होऊ. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वांनी मिळून परिश्रम घेऊ आणि मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकावू, असा प्रत्येकांनी निर्धार करावा. प्रत्येकांनी आपापली जबाबदारी चोखपणे बजावावी, असेही आवाहन केले.
यावेळी आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अशी आहे चंद्रपूर शहर कांग्रेसची जम्बो कार्यकारणी
कार्यकारिणीत उपाध्यक्ष संगीता अमृतकर, प्रशांत दानव, प्रवीण पडवेकर, दुर्गेश कोडाम, चंद्रमा यादव, राजेश रेवल्लीवार, अश्विनी खोब्रागडे, प्रसन्ना शिरवार, निखिल काच्छेला, मनीष तिवारी, संजय रत्नपारखी, नंदकिशोर लहामगे, विजय धोबे, चंदा वैरागडे, विजय चहारे, पीर मोहम्मद (बापू) अंसारी, अमित (पिंकी) दीक्षित, कोषाध्यक्ष अख्तर (पप्पू) सिद्दीकी, सरचिटणीस गोपाल अमृतकर, राज यादव, जवाहरभाई पंजाबी, राजू नंदनवार, सुधाकर चन्ने, कल्पना गिरडकर, अजय बल्की, राजू वासेकर, ऍड. विक्रम टंडन, संजय गंपावार, ऍड. प्रीती शहा, मंगेश डांगे, रवी भिसे, इरफान शेख, मनोज खंडेकर, महेंद्र अडूर, सलीम शेख, चिटणीस सुरेश टापरे, स्वप्नील केळझरकर, नागेश बंडेवार, पंकज इटनकर, नीलेश पाउणकर, सैय्यद आसिफ, हाजी अली, गणेश निमकर, प्रसिद्धीप्रमुख सुलतान अश्रफ अली, चेतन दुरसेलवार, कासिफ अली यांची निवड करण्यात आली आहे.
विशेष निमंत्रित म्हणून माजी आमदार देवराव भांडेकर, विनोदजी दत्तात्रय, संतोषजी लहामगे, श्रीकांतजी चहारे, युसूफभाई सिद्दीकी, ऍड. विजयजी मोगरे, कृष्णकन्हैया सिंग, डॉ. विश्वास झाडे, बंडोपंत तातावार, अनिता कथडे, तर कायम निमंत्रित म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री, जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, जिल्ह्यातील प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील आघाडी संघटनांचे जिल्हाध्यक्ष यांचा समावेश राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिली आहे.