News34
प्रतिनिधी/रमेश निषादबल्लारपूर - विद्यानागर वार्ड निवासी ऑटो चालक मालक सुशांत भीमराव झाडे यांनी राहत्या घरी शनिवारी गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या मित्र व नातेवाईकांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे.
सुशांतने काही कामानिमित्त एका खाजगी कंपनीकडून कर्ज घेतले मात्र ते कर्ज तो वेळेवर फेडू शकला नाही यासाठी त्याने तब्बल 40 टक्के व्याजाने सावकाराकडून 5 हजार रुपये कर्ज घेतले होते, मात्र ते वेळेत परत करण्यास सुशांत असमर्थ राहिला.
त्यामुळे सावकाराने पैश्यासाठी वारंवार तगादा लावला, त्याच्यासोबत मारहाण सुद्धा केली, पैसे परत कर अन्यथा ऑटो जप्त करेल अशी धमकी त्याला देऊ लागला. सतत त्याला मानसिक त्रास झाल्याने त्याने या दडपणातून गळफास घेतला असावा असा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. #news34
सध्या बल्लारपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.