चंद्रपूर - 29 जुलैला शहरातील नगीनाबाग निवासी 32 वर्षीय राजू प्रभाकर गुरनुले यांनी आपली दुचाकी मोपेड वाहन क्रमांक एमएच34 ए. एन. 8252 गॅरेज च्या बाहेर उभी केली होती, मात्र काही वेळानंतर ती मोपेड त्या ठिकाणी आढळून आली नाही.
दुचाकींचा अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र ती कुठेही आढळली नसल्याने गुरनुले यांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठत वाहन चोरीची तक्रार दिली.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता रामनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता अष्टभुजा वॉर्ड निवासी 27 वर्षीय शिवकुमार साहू ला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली, साहू ने दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली.
रामनगर पोलिसांना गुरनुले यांच्या दुचाकीसह तब्बल 4 दुचाकी आरोपी साहू यांचेकडून जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर गाडी कमांक एम . एच . ३४ बी.एन .७६४९ किमंत ४० हजार, सिल्वर रंगाची हिरो होंडा स्लेन्डर गाडी क्रमांक एम . एच . ३४ झेड ९ २ ९ किमंत ३५,००० / - रूपये, लाल रंगाची टि.व्हि.एस. क्रमांक एम.एच. ३४ झेड २ ९ ४० किमंत २५,००० / - असा एकूण 1,30,000 मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वात सपोनि मलिक, एकरे, पो हवा . रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे , नापोशि / पुरुषोत्तम चिकाटे , ना पोशी . संजय चौधरी , किशारे वैरागडे आदींनी यशस्वीपणे पार पाडली. #news34