चंद्रपुर - शहरातील खड्डेमय रस्त्याच्या ज्वलंत समस्येला घेऊन युवासेना च्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे ,महानगरप्रमुख प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना च्या शिष्टमंडळाने चंद्रपुर महानगर पालिका उपायुक्त विपिन पालीवाल यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. अमृतयाेजना अतंर्गत सर्वत्र खड्डे खोदून ते आजतागत बुजविलेले नाही, पावसाळ्याचे दिवस असतांना सुद्धा महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ते तसेच असून त्यामध्ये सांडपाणी जमा होत आहेत त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून डे़ंगू, मलेरिया सारख्या रोगाला नागरीकांना सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत असून सुद्धा याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. तसेच मोठ मोठ्या खड्यामुळे लोकांना रहदारी करत असतांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून या खड्ड्यांमुळे दुर्घटनेला आमंत्रण दिल्यासारखे होत आहे एखादी अनुचित जीवित हानी झाल्यावरचं महानगरपालिका जागी होनार आहे का असा प्रश्न सुद्धा यावेळी करण्यात आला. मागील महानगरपालिका सभेत हा मुद्दा इतका गाजला असतांनासुद्धा अजूनपर्यंत कुठलेही पाऊल महानगरपालिकेच्या वतीने उचलेले नाही.
शहरातील तुकूम परिसरातील रस्त्यांची दशासुद्धा यावेळी फोटो च्या माध्यमातून आयुक्तांना युवासेना च्या वतीने निदर्शनास आणून दिले.यावर लवकरात लवकर उपाययोजना करून चंद्रपुर महानगरातील सर्व प्रभागातील रस्त्याची ही समस्या सोडवावी अन्यथा स्थानिक नागरिकांना घेऊन याबद्दल आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी युवासेनाच्या वतीने देण्यात आला. #news34

यावेळी युवासेना शिष्टमंडळात युवासेना जिल्हा चिटनीस विनय धोबे, उपजिल्हा युवा अधिकारी अनिरूद्ध तपासे, शहर अधिकारी अक्षय अंबिरवार, शहर समन्वयक करन वैरागडे, शहर चिटनीस नगाजी गनफाडे, नंदकिशोर अराडे, प्रसन्ना शेरेकार यांची उपस्थिती होती.