नागभीड - 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता शहरातील चवडेश्वरी मंदिर परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय पूजा रवींद्र सलामे या विवाहित महिलेची धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली. News 34
हत्येचा आरोपी परसोडी येथे राहणारा 25 वर्षीय विवेक ब्रह्मदास चौधरी याने नागभीड पोलीस स्टेशनला जात गुन्ह्याची कबुली दिली.
पूजा चं लग्न चिखल परसोडी येथील बागडे नामक परिवारात झाले होते मात्र पती सोबत वारंवार तिचे खटके उडायचे या कारणामुळे ती पतीला सोडून आपल्या आईकडे स्थायिक झाली होती.
6 महिन्यांपूर्वी पुजाचे सूत विवेक सोबत जुडले होते, विवेक ला पूजा सोबत लग्न करायचे असल्याने त्याने वारंवार पुजाकडे लग्नाचा तगादा लावला, मात्र पूजा लग्नाच्या नावावर विवेक ला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली, यावर मागील महिन्यात पूजा आणि विवेक यांचं भांडण झाले होते.
14 ऑगस्टला विवेक पूजाच्या घरी गेला त्यावेळी पूजा ची आई बाहेर गेली होती, विवेक ने पुन्हा पूजा ला लग्न कधी करणार याबाबत विचारणा केली मात्र पूजा पुन्हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने विवेक चा पारा चढला त्याने पूजाच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले या हल्ल्यात पूजा चा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर विवेक ने नागभीड पोलीस स्टेशन गाठत गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपी विवेक ला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला.

