प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - दिनांक 31/08/2021 रोजी तहसिल कार्यालया, मूल येथे संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेमध्ये निराधार गरजू लाभार्थ्याचे 221 प्रकरणांची छाननी व तपासणी केल्यानंतर समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांनी मंजुरी दिली. यामध्ये इंदिरा गांधी विधवा योजना व संजयगांधी निराधार योजना - 48, श्रावणबाळ योजन-102 वृध्दपकाळ योजना-71 असे एकूण 221 प्रकरणे मंजूर करण्यांत आले.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर केलेले आहे परंतु, सदर प्रकरणात कांही त्रृटी असल्यामुळे त्रृटयांची पूर्तता तात्काळ करून दुरुस्ती केल्यानंतर विशेष सभा आयोजित करण्यांबाबत निर्णय घेण्यांत आलेला होता. निर्णयाचे अनुषंगाने 1 महिण्यांत पुन्हा सभा घेवून लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात येऊन लाभार्थ्यांना समितीने दिलेला शब्द पाळलेला आहे.
तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश या.रत्नावार हे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्यांचे दृष्टीने नेहमीच प्रयत्नशिल आहेत. सदर योजने संबंधाने कांही अडचणी असल्यास तहसिल कार्यालयाचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करण्यांत यावी. व दलालापासून सावधान राहावे. यानंतरही काही अडचण असल्यास संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन देखील समितीने केले आहे. आयोजित सभेला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, मा.राकेश या.रत्नावार, मा.ठाकरे साहेब,नायब तहसिलदार, तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य नितीन येरोजवार, गंगाधर कुनघाटकर, दशरथ वाकुडकर, संजय गेडाम, सो.अर्चना चावरे, सोनल मडावी, सुनील शेन्डे व संजय गांधी निराधार योजनेचे संबंधित कर्मचारी गिरडकर उपस्थित होते.