चंद्रपूर - विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री असताना चंद्रपूर जिल्हयात विविध प्रकल्पांसाठी मुबलक निधी आणला. त्याच धर्तीवर जिल्हयातील सर्व बस स्थानके टप्प्याटप्प्याने नविन बांधण्यासाठी सुध्दा निधी दिला. ज्यामध्ये बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा, चंद्रपूर यांचा पहिल्या टप्प्यात समावेश होता. त्यापैकी बल्लारपूर बस स्थानक महाराष्ट्रातील सर्वोत्तम बस स्थानक म्हणून गणल्या गेले आहे. तसेच मुल व चंद्रपूर येथेही आ. मुनगंटीवार यांनी निधी दिला. चंद्रपूरला १६ कोटी रू. बसस्थानकासाठी मंजूर केले व त्यातील ६ कोटी १८ लक्ष रू. एवढा निधी सुरूवातीच्या कामासाठी दिला. २०१८ पासून या बांधकामाला सुरूवात झालेली असून हे काम २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु महाविकास आघाडी सरकारने गेल्या दिड वर्षात या प्रकल्पाकरिता एकही रूपया न दिल्याने चंद्रपूर बसस्थानकाचे नुतनीकरणाचे काम संपूर्णपणे थांबले आहे. Chandrapur Bjp
याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरातर्फे सरकारच्या निषेधार्थ ढोल बजाओ आंदोलन बस स्थानक परिसरात करण्यात आले. ढोल वाजवून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे असे चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी यावेळी बोलताना सांगीतले. ते पुढे म्हणाले की मी महाविकास आघाडी सरकारचा तिव्र शब्दात निषेध करतो. पुढे डॉ. गुलवाडे म्हणाले, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या चांगल्या प्रकल्पांना या शासनाने निधी देण्याचे टाळले आहे ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण बाब आहे. याचाच निषेध म्हणून भाजपा चंद्रपूर सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करीत आहे व पुढील १५ दिवसात या प्रकल्पासाठी निधी मंजूर न झाल्यास त्यापुढे आणखी तिव्र आंदोलन करण्यात येईल.
या आंदोलनात उपमहापौर राहूल पावडे, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. अंजली घोटेकर, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर, महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, रवि गुरनुले, सुभाष कासनगोट्टूवार, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, मनपा सभागृह नेता संदीप आवारी, नगरसेवक संजय कंचर्लावार, अनिल फुलझेले, सौ. शिला चव्हाण, सौ. वनिता डुकरे, माया उईके, शितल गुरनुले, सविता कांबळे, ज्योती गेडाम, शितल कुळमेथे, पुष्पा उराडे, देवानंद वाढई, मंडल अध्यक्ष रवि लोणकर, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, संदीप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, सौ. भारती दुधानी, सौ. पुनम गरडवार, अनुसूचित जमाती आघाडीचे धनराज कोवे, महानगर उपाध्यक्ष अरूण तिखे, मनोरंजन रॉय, सौ. मंजुश्री कासनोट्टूवार, सौ. प्रज्ञा गंधेवार, सौ. प्रभा गुडधे, सौ. वंदना संतोषवार, पुरूषोत्तम सहारे, पुनम तिवारी यांची उपस्थिती होती.