चंद्रपूर - मनसेचे जिल्हाअध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार यांच्या प्रमुख मार्गदर्शणात मनसेचे चंद्रपूर जिल्हासचिव किशोर भाऊ मडगुलवार यांनी डब्लू.सी.एल. चंद्रपूरचे नवनियुक्त कार्यरत झालेले महाप्रबंधक साहेब यांचे मनसे तर्फे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले व कोरोना लसीकरणावर चर्चा करण्यात आली. सद्या कोरोनाची दुसरी लाट जरी कमी झाली असली तरी तज्ञांच्या माहिती नुसार तिसरी लाट सुद्या काही महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या तिसऱ्या कोरोना लाटेला जर रोखायचे असेल तर त्यावर एकच उपाय आहे ते म्हणजे लोकांचे लसीकरण करणे, त्यासाठी चंद्रपूर जिल्हात डब्लू.सी.एल ची अनेक विभागीय रुग्णालये आहे त्या रुग्णालयात जर लसीकरण सुरु केले तर जिल्हात लसीकरणाचा वेग नक्की वाढेल. त्या मागणीसाठीच शुक्रवार दि.०२/०७/२०२१ रोजी मनसे जिल्हा सचिव किशोर मडगूलवार यांच्या नेतृत्वात डब्लू.सी.एल. चे महाप्रबंधक साहेब यांची भेटू घेऊन डब्लू.सी.एल. च्या विभागीय रुग्णालयात लसीकरण सुरुकरण्याची मागणी केली. या प्रसंगी चंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,महिला जिल्हाउपाध्यक्ष शोभाताई वाघमारे, प्रविण शेवते,वाणी सदालावार,महेश पडपेल्लीवार,सचिन गुप्ता,शैलेश सदालावार यांची उपस्थिती होती.
