चंद्रपूर - महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी यांच्या माध्यमातून चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघाचे खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन दान कार्यक्रम व टीशर्ट वाटप कार्यक्रम शासकीय जिल्हासमान्य रुग्णालयात करण्यात आला. यावेळी उपस्थित गरजूंना खासदार बाळू भाऊ धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः उपस्थित राहून गरजूंना भोजन व टीशर्ट वाटप केले. त्याच सोबत मतीन कुरेशि यांच्या कडून लता बारापत्रे यांच्या मुलीला खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते विलचेअर देण्यात आली . या कार्यक्रमला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, उपाध्यक्षा सुनीता धोटे, मतीन कुरेशी, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर,उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, सदस्य लता बारापात्रे,पायल खांडेकर, चंदा वैरागडे, ऐजाज कुरेशी,मंजू भारती, किरण वानखेडे, कांचन रसाड, कविता मेश्राम, पल्लवी वानखेडे, संगीता बोरकर, रेणू सोनटक्के, सबिया पठान, मंजू झाडे, ब्रिजेश तामगडे, वसीम शेख, सुनील चौहान, स्वप्नील कवाडे, अनंता गिरडकर, हमीद भाई,संजू तामगडे, लीला बुटले,स्नेहल अंबागडे,वंदना खेळकर यांची उपस्थिती होती.
