मूल - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने
मागील २० महिन्यांपासून शासनाकडे ३२ मागण्या केल्या असून महाविकास आघाडी सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये उदासीनता पसरली आहे. याविरुध्द ५ जुलै २०२१ रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करत मागण्यांबाबत जिल्हा तालुका विभाग ,राज्य स्तरांवर शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेने तीव्र, उग्र आंदोलन करणे टाळले असून शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचे शिक्षक परिषदेच्या कार्यकारिणी ने निर्णय याबाबत घेतला आहे.
शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे शिक्षक असणारे एकमेव आमदार नागो गाणार यांनी दि. १ जुलै ला शासनाला वेगवेगळ्या ३२ मागण्यांचे निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष वेणूनाथ कडू कार्यवाह नरेंद्र वातकर यांनी 30 जून रोजी शासनाला कळवले असून शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
तरी चंद्रपूर जिल्हातील सर्व शिक्षकांनी आप-आपल्या शाळेमध्ये काळ्या फिती लावून कार्य करावे. व शासनाप्रति निषेध नोंदवावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक विभाग जिल्हा शाखा-चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष संतोष सोनवणे यांनी केले आहे.
