चंद्रपूर - देशात कोरोना महामारी च्या संकटात संपुर्ण देशात शाळा महाविद्यालये बंद आहेत, विद्यार्थी आँनलाईन शिक्षण घेत आहेत. कोरोना मुळे धंदा-रोजगार बंद पडल्याने पालक वर्ग आर्थिक संकटाचा सामना करित आहे. अश्या संकट काळात पैश्याची अडचण असतांना आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक विचाराने पालक वर्ग अधिक संकटात पडले आहेत. अश्यावेळेच शाळेची फि, परिक्षा शुल्क भरायचा कसा? आपल्या मुला मुलींच्या शैक्षणिक समस्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतांना यावर मदतीची आस ठेवून विविध विद्यार्थी पालकांनी युवासेना कडे मदतीची अपेक्षा केली असतांना नुकतेच उच्च तंत्रशिक्षण मंत्री मा. सामंत साहेब हे चंद्रपुर दौऱ्यावर आले असता शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपजी गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडवाना विद्यापिठातील विद्यार्थ्यांना यातून दिलासा द्यावी हि विनंती संदर्भात युवासेनेचे शहर समन्वयक करन वैरागडे यांनी यासंदर्भात निवेदन देऊन याबद्दल चर्चा करण्यात आली, यावेळी चर्चे दरम्यान मंत्री महोदयांनी गोंडवाना विद्यापिठातील विविध समस्या जाणुन कुलगुरूंशी याबद्दल चर्चा करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात येणार असे आश्वासन युवासेना शिष्टमंडळाला दिले त्यानुसार मा. सामंत साहेबांनी विद्यार्थी पालकांना दिलासा देणारा निर्णय घेऊन गोंडवाना विद्यापिठाच्या विविध शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे चंद्रपुर, गडचिरोली विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या बद्दल युवासेना जिल्हा चंद्रपुर च्या वतीने मा.मंत्री महोदय सामंत साहेब तसेच विद्यापिठातील व्यवस्थापन मंडळाचे आभार मानले आहेत.
