News34
चंद्रपूर - महावितरण मध्ये विजतंत्री या पदावर शिकाऊ उमेदवारांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे, आधीच कोरोनामुळे अनेकांनी आपले रोजगार गमावले, आज लाखो बेरोजगार रोजगारासाठी वणवण भटकत आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी चंद्रपूर मार्फत भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटीस या पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी चंद्रपूर भरती 2021 साठी एकूण 30 जागा रिक्त आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 जुलै 2021 असणार आहे.
सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जुलै 2021 असणार आहे,
ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवारांनी मोबाईल क्रमांक व सध्या सुरू असलेल्या इमेल आयडी वरून अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लीक करावे..
https://www.mahatransco.in/career/active
