घुग्गुस - शहराच्या जवळ असलेली लॉयड्स मेटल एन्ड एनर्जी ली. कंपनीने कारखान्याचा विस्तार करण्याचे ठरविले आहे.
सध्या कंपनीत 500 क्षमतेचा 1 व 100 क्षमतेचे 4 युनिट आहे, या युनिटपासून 3 लाख 24 हजार टिपीए इतकं उत्पादन होत असून 25 एमएस कारखान्यातून वीज निर्मिती सुरू आहे.
आधीच कंपनीच्या प्रदूषणाबाबत शहरवासी त्रस्त आहे त्यातच आता पुन्हा या प्रदूषणात भर होणार आहे.
बुधवारी 760 कोटींच्या नवीन प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी घेण्यात आली, त्यामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेतला, कंपनी व्यवस्थापन, प्रशासनिक अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कंपनी व्यवस्थापनाने या नवीन प्रकल्पाबाबत माहिती देत, प्रदूषण होणार नाही अशी हमी दिली, मात्र अनेकांनी व्यवस्थापनाचा विरोध केला, सध्या सुरू असलेल्या युनिट मधून क्षमतेच्या बाहेर प्रदूषण वाढत असून त्याला नियंत्रण करणे कंपनी व्यवस्थापनाला शक्य होत नाही आणि पुन्हा यामध्ये भर देत आहे.
यावर मात्र कंपनी व्यवस्थापनाने मौन बाळगले.
कोरोना महामारीत प्रदूषण ही कारणीभूत आहे असा अंदाज काही दिवसांपूर्वी तज्ञांनी लावला होता, एकेकाळी देशात प्रदूषणामध्ये क्रमांक 1 व असलेल्या घुग्गुस मध्ये पुन्हा प्रदूषण वाढविण्याचे काम होत असेल तर जगात क्रमांक 1 वर घुग्घुस शहराच नाव लवकरच झळकणार यात काही शंका नाही.
आधीच प्रदूषणाने अनेक नागरिक दमा सारख्या आजाराने त्रस्त आहे व आता कोरोना मुळे याला कारणीभूत आपण स्वतः आहोच, मात्र कंपनी व्यवस्थापन आपल्याला रोजगार देणार अस जाळ राजकीय पक्षांनी निर्माण केल्याने नागरिकही या प्रकल्पाचा विरोध करू शकत नाही आहे.
पर्यावरण प्रेमी सुद्धा यावर गप्प आहे.
आधीच या कंपनीत कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने साधन पुरविल्या जात नाही, सुरक्षेच्या साधना अभावी अनेक कामगार कंपनीत मृत्यू पावले यावर का कुणी बोलत नाही?
या प्रदूषणामुळे समोरची पिढी कशी असणार हे तर येणारी वेळच सांगेल, घुग्गुस नगरपरिषदेसाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत पुढाकार घेतला होता तर मग सर्व पक्ष या प्रदूषणाला विरोध का करीत नाही? रात्र झाली की स्थानिक उद्योग शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचे जाळ पसरवीत असतात.
राजकीय पक्षांना घुग्गुस शहरातील नागरिकांची इतकीच चिंता असती तर त्यांनी लॉयड्स मेटल कंपनीत सध्या सुरू असलेल्या प्रदूषणावर मौन बाळगले नसते.
हे वाचा
सोशल मिडीयावरून झालेल्या प्रेम विवाहाचा अंत
