प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल (प्रतिनिधी)
राजकिय क्षेत्रातील विरोधकांनी सुखदेवे यांना हाताशी धरून बनावट लेटर पॅडद्वारे आपल्या विरूध्द षडयंत्र रचला असून भविष्यात विपरीत घटना घडण्याची शक्यता आहे, त्यामूळे पोलीसांनी बनावट पत्राची सखोल चौकशी करावी. अशी मागणी पंचायत समिती सभापती चंदु मारगोनवार यांनी केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांचे उपस्थितीत सभापती कक्षात आयोजीत कक्षात बोलतांना सभापती चंदु मारगोनवार यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने आजपर्यंत अनेक विकास कामांचा पाठपुरावा केला परंतु धमकी दाखविण्याचा पत्रव्यवहार आजपर्यंत कधीच केलेला नाही, असे सांगतांना काॅम्प्युटर आँपरेटरच्या सहकार्याने सभापतीचे लेटर पॅड आणि स्वाक्षरी स्कॅन करून राजकिय विरोधकांनी पत्र पाठविले असून पाठविलेले पत्र आणि स्वाक्षरीची फाॅरेन्सीक लॅब मध्ये तपासणी करून प्रकरणाचा छळा लावावा. अशी तक्रार पोलीसात नोंदविल्याचे त्यांनी सांगीतले. बनावट पत्र तयार करून बदनामी करण्याच्या प्रकरणात सचिव सुखदेवे मुख्य आरोपी असून सदर प्रकरणात सहकार्य करणारे कोण आहेत, याची माहिती आपल्याला मिळाली असून त्यांची नांवे पोलीसांना सांगणार असल्याचे मारगोनवार यांनी स्पष्ट केले. सरपंच आणि ग्राम विस्तार अधिकारी यांनी ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याने ग्राम पंचायत सदस्य नाराज होते. आपल्या नेतृत्वात ग्राम पंचायत निवडणुक लढविल्यानंतर सरपंचासह पंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली. त्यामूळे सदस्यांना विश्वासात घेवून पंचायतीचे कामकाज करा. असा सल्ला आपण तत्कालीन सरपंच यांना अनेकदा दिला. परंतू त्यांनी आपले काही एक न ऐकता ग्राम विस्तार अधिकारी सुखदेवे यांच्याशी संधान साधुन कामकाज सुरूच ठेवला. परिणामी ग्राम पंचायत सदस्यांची नाराजी दुर करण्यासाठी नाईलाजास्तव आपल्याच पक्षाच्या सरपंचावर अविश्वास आणावा लागला. असे सांगतांना मारगोनवार यांनी शासनाने विकास कामे करण्यासाठी १० लाख किंम्मतीच्या खालील कामे करण्यासाठी आँफलाईन निवीदा पध्दत सुरू केली त्यामूळे त्या नियमाचे पालन करून कामे करावी. असा सरपंच व सचिव यांना आपण सल्ला दिला. परंतू त्या दोघांनीही आपले म्हणणे न ऐकता आँफलाईन निवीदे संदर्भातील शासन निर्णयाचे उल्लंघन करून पंचायत मध्यें मनमानी कारभार चालविला. ८ लाख आणि २.६४ लाख किंम्मतीच्या दोन्ही कामात सरपंच आणि सचिव यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याने पंचायतीचे सदस्य नाराज होते. नाराज सदस्यांच्या बहुमताने सरपंचा पायउतार झाल्या परंतू सचिव सेवारत असल्याने सचिव सुखदेवे यांना नियमाबाहय काम करीत असल्याचं कारणावरून निलंबीत करावे. अशी मागणी करणार असल्याचे सांगतांना मारगोनवार यांनी आपल्या नांवाने केलेल्या पत्रव्यवहारा विषयी अनेक शंका व्यक्त केल्या. यावेळी माजी सभापती तथा पं.स.सदस्या पुजा डोहणे, वर्षा लोनबले, न.प.उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, न. प. सभापती प्रशांत समर्थ, पं.स. माजी उपसभापती अमोल चुदरी, सरपंच संजय येनुरकर, बंडु नरमलवार, उपसरपंच मुन्ना कोटगले, राजु पोटे, दिलीप पाल आदि उपस्थित होते.
पञाव्दारे धमकी देणाऱ्या सभापती विरूध्द ग्रामसेवक संघटनेचा एल्गार*
मूल (प्रतिनिधी) बेंबाळ ग्राम पंचायतीचे विस्तार अधिकारी आशिक सुखदेवे यांना पत्राद्वारे धमकी देवून शासकिय कामात अडथळा आणला, या कारणावरून पंचायत समिती सभापती चंदु मारगोनवार यांचे विरूध्द कार्यवाही करावी. अशी मागणी राज्य ग्रामसेवक संघटनेच्या मूल शाखेने केली असून मागणीच्या पुर्ततेसाठी आजपासून लाक्षणीक आंदोलन सुरू केले आहे. संवर्ग विकास अधिकारी यांचे शिवाय संबंधीत वरिष्ठ अधिका-यांना पाठविलेल्या निवेदनात संघटनेच्या पदाधिका-यांनी सभापती चंदु मारगोनवार हे बेंबाळ ग्राम पंचायत मध्यें सहा महिण्यांपासून सेवारत असलेले ग्राम विस्तार अधिकारी आशिक सुखदेवे यांना विविध शासकिय कामे करतांना अडथळा निर्माण करीत असून त्यांच्या मर्जी नुसार कामे न केल्यास सचिव सुखदेवे यांना वारंवार जीवीत मारण्याची धमकी देत असतात. स्वतःच्या स्वार्थापोटी बेंबाळ ग्राम पंचायतीच्या सरपंचा यांचे विरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल करून त्यांना पदावरून दुर केल्याचा आरोप केला आहे. मारगोनवार यांच्या लेखी पत्रामूळे सचिव सुखदेवे यांच्या जीवीताला धोका निर्माण झाला असून मारगोनवार हे पंचायत समिती सभापती असल्याने त्यांचे पासून इतरही ग्राम सेवकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामूळे सभापती मारगोनवार यांचे विरूध्द १७ जुलै २००७ च्या शासन परिपत्रकानुसार चौकशी करून कार्यवाही करावी. अशी मागणी केली आहे. संघटनेच्या सदर मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या मूल शाखेच्या वतीने आज पंचायत समिती परिसरात एक दिवसीय लाक्षणीक आंदोलन केले असून ५ जुलै पासुन मूल तालुक्यात सेवारत संघटनेचे सदस्य असहकार आंदोलन करणार आहेत. या आंदोलनानंतरही सभापती मारगोनवार यांचेवर कारवाई न झाल्यास मूल तालुक्यात काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल. असा इशारा दिला आहे. यावेळी संघटनेचे मूल शाखाध्यक्ष विजय यारेवार, उपाध्यक्ष प्रतिभा मस्कावार, सचिव आशिक सुखदेवे यांचेसह सहसचिव किशोर रामटेके, कोषाध्यक्ष आकाश कळमकर, सल्लागार विजय सातपुते, सदस्या निराशा पाकमोडे, वनिता कोडापे, राजेंद्र येरमे, सुरज आकनपल्लीवार व कैलास फुलझेले आदि उपस्थित होते.

