वरोरा - सध्या संपूर्ण जगासोबत भारतात सुध्दा कोरोनाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात सर्व शाळा व महाविद्यालये आहेत. त्याअनुषगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. ना. बचूभाऊ कडू (शालेयशिक्षण मंत्री) यांचा आदर्श समोर ठेवून तसेच प्रहारसेवक इंजी.अक्षय बोंदगुलवार व प्रहारसेवक शेरखान पठाण यांच्या पुढाकाराने दादापुर येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते अमोल मोरेश्वर नन्नावरे हा गावातील गरीब, हुशार तथा होतकरू विद्यार्थ्यांना निःशुल्क ज्ञानाचे धडे देत आहे. ग्रामीण भागातील मुल इकडे तिकडे विनाकारण फिरू नये व त त्यांच्या भविष्यातील शिक्षणाचं नुकसान होऊ नये व ते योग्य शिक्षणाच्या प्रवाहात राहावे यासाठीच हा उपक्रम अमोलनी हाती घेतला आहे. अमोल सध्या ग्रॅज्युएशन पूर्ण करून M. A. पॉलिटिकल सायन्स सुरू आहे तसेच एमपीएससी तथा युपीएससीची तयारी सुद्धा सुरू आहे. या उपक्रमामुळे परिसरात अमोलचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहे.