कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल २२ जुलै रोजी संपुष्टात आला.या निमित्ताने ग्रामसेवक सतीष मडावी व सहकाऱ्यांनी छोटेखानी निरोप समारंभाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विनोद नवले होते तर उदघाटन भाजप तालुकाध्यक्ष तथा उपसरपंच नारायण हिवरकर यांच्या हस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं.सदस्य आनंदराव शेडमाके,सौ.सरीता केराम,सौ. नंदा मोहुर्ले यांची उपस्थिती होती.यावेळी मावळते सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामवासीयांनी आमच्यावर विश्वास ठेवून निवडून दिले.पाचवर्ष काम करण्याची संधी दिली याबद्दल मी सर्व ग्रामवासीयांचे मनापासून आभारी असून हा कार्यकाल विकास कामांच्या दृष्टीने उत्तम राहीला.गाववासीयांच्या सहयोगाने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हे पाच वर्षे कसे गेले कळलेच नाही.यानंतर आम्ही ग्रामपंचायत मध्ये "असो किंवा नसो" मात्र गावाच्या विकास कामाविषयी तत्परतेने हातभार लावत राहु.असे मौलिक मत मावळते उपसरपंच नारायण हिवरकर यांनी यावेळी व्यक्त केले.तसेच उपस्थीत मान्यवरांनी सुद्धा आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक मडावी यांनी तर शारदा मेश्राम यांनी आभार व्यक्त केले.
तसेच कन्हाळगाव ग्रामवासीयांनी सुद्धा येथील हनुमान मंदिरात कार्यक्रमाद्वारे ग्रा.पं.च्या या मावळत्या कारभाऱ्यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराम कोल्हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विशाल गज्जलवार, अंगणवाडी सेविका सौ.मंदा टेकाम,डॉ.प्रमोद परचाके,नत्थु पा.वरपटकर,रमेश पा.जेनेकर,श्याम वासेकर,दिवाकर मालेकर,सुरेश पा. दोरखंडे, गुणवंत बुरडकर,प्रकाश पा.डाहुले, मनोज गोरे,वासूदेव पा.दुर्वे,सुरेश येरेकर, आशीष क्षिरसागर ईत्यादींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन प्रकाश डाहुले,आभार दिवाकर मालेकर यांनी व्यक्त केले.यांच्या कार्यकाल संपला आता ग्रा.पं.चे नवे कारभारी कोण ? हा येणारा काळच ठरवेल.