सिंदेवाही :- कोरोनाचा ओघ कमी होत असला तरी प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे, मात्र प्रशासनाच्या आवाहनाला कुणीही प्रतिसाद देत नसून कोरोनाचे सर्व नियम नागरिक पायदळी तुडवीत आहे.
प्रशासन फक्त नागरिकांना आवाहन करीत असून कारवाईच्या नावाने मात्र दुर्लक्ष करीत आहे असे या आयोजनावरून दिसत आहे, या गर्दीत कोरोना गायब झाला की काय असेच निदर्शनास येत आहे.
राज्यात बैलगाडी शर्यतिला बंदी असतानाही जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथे सकाळच्या सुमारास बैलजोडी शर्यत भरवून लाखोचा जुगार खेडला गेला. राज्यात बैलजोडी शर्यतीस बंदी व कोरोणा नियम धाब्यावर बसबून शेकडो लोकांच्या उपस्थितीत बैलजोडी शर्यत खेळल्या गेली. यापूर्वी २८ जून रोजी अशाच प्रकारे देलनवाडी गावात बैलजोडी शर्यत भरविली गेल्याची चर्चा असून, त्यामुळे स्थानिक प्रशासन व तालुका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
