प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावर कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कँसरसारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या रूग्णांना,शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे काम केले आहे.एवढेच नव्हे तर साप चावून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना, घर जळून बेघर झालेल्यांना व धानाचे पुंजने जळून आकस्मिक आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन रुग्णांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम बँक करीत असून मुल तालुक्यातील कोसंबी येथील अल्प भूधारक शेतकरी मनोज भाऊजी मोहूर्ले यांना तोंडाला कँसर झाल्याने उपचारासाठी ४००००/-हजार रुपये मदतीचा चेक देण्यासाठी कोसंबी येथे गेले असता बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे सरपंच,उपसरपंच,सदश व ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . आणि अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी कँसरग्रस्त रुग्णांच्या घरी जाऊन रुग्णाला चेक दिला.तसेच गावातील महिलांनी नौकरीच्या मागे न लागता बचत गट स्थापन करुन बँकेकडून कर्ज घेऊन गावातच लघु व किरकोळ उदयोग, दुग्धव्यवसाय, किरकोळ व्यवसाय करावा असा सल्ला बचत गटाच्या महिलांना बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी दिला. यावेळी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, माजी संचालक वामन चांभारे , गुरु गुरनुले, बँकेचे अधिकारी नांदूजी मडावी, ग्राम पंचायत सरपंच रवीन्द्र कामडी, उपसरपंच सारिका गेडाम, कांग्रेस कार्यकर्ते विनोद कामडी, ग्राम पंचायत सदश चंदाताई कामडी,अरुणा वाढई, रोशनी मोहूर्ले, मनीष चौधरी,सुवर्णा कावळे, यांचेसह महेश चौधरी, गणेश साठोणे, मुख्याध्यापक प्रशांत गटलेवार, पोलीस पाटील अर्चना मोहूर्ले, व अनेक गावकरी उपस्थित होते.
