चिमूर - येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभूळघाट येथे पतीने पत्नीला काठीने मारहाण करून खून केला असून आरोपी फरार झालेला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे शालू बबलू सेंदेकर 40 मृतक पत्नीचे नाव असून आरोपीचे नाव बबलू सेंदेकर 45 असे आहे हे दोघे जांभुळघाट येथील रहिवासी असून बबलू सेंदेकर यांचा पान टपरी चा व्यवसाय आहे.
गावाला लागूनच असलेल्या झुडपी जंगलात आज दोघेही पती-पत्नी काड्या आणण्यासाठी गेले असता तिथे त्यांच्यात भांडण झाले आणि त्या भांडणात आरोपी बबलू ने पत्नीला काठीने मारहाण केली त्या मारहाणीत तिचा जागेवरच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यामुळे आरोपीने घाबरलेल्या अवस्थेत गावात येऊन ही माहिती दिली व फरार झाला. गावातील लोकांनी पोलीस ठाणे भिसी ला माहिती दिली घटनेचे गांभीर्य ओळखून भिसी चे ठाणेदार गभने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. अधिक तपास ठाणेदार मनोज गभने करीत आहे, या दाम्पत्याला 22 वर्षीय मुलगी असून तिचे लग्न झाले आहे मात्र या खूनामुळे दहा वर्षाचा मुलगा आईला पोरका झालेला आहे.