घुघुस - चंद्रपूर - वणी मार्गावर 20 जुलैला रात्री 8 वाजेदरम्यान एक युवक आपल्या चारचाकी वाहनाने घरी जात होता मात्र अति मद्य प्राशन करून असल्याने त्याने दुसऱ्या चारचाकी वाहनाला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की पुढील वाहन हे मार्गावरील डिव्हायडर वर चढून गेले.
चारचाकी वाहन चालक कोमल ठाकरे हे वाहन क्रमांक MH34-K-6199 ने घरी जात होता, मात्र त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याने गाडी वेगाने चालवीत होता. (fast and furious)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणजवळ कोमल ठाकरे याने वाहन क्रमांक MP-CJ-0691 ला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली.
सुदैवाने त्या वाहनातील 4 जण किरकोळ जखमी झाले मात्र कोमल ठाकरे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.