चंद्रपूर - कोणतीही राजकीय पार्श्वभूमी व अनुभव नसताना व भाजपचे उमेदवार फक्त निवडणुकीत पडण्यासाठीच की काय उभे राहातात अशी बिकट व काँग्रेसच्या तिकिटावर कुणालाही उभे केले तरी ते हमखास निवडून येतीलच अशी परिस्थिती असताना श्री सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar birthday) नावाचा युवक धाडसाने तत्कालीन खासदार दिवंगत शांतारामजी पोटदुखे सारख्या मातब्बर काँग्रेसी उमेदवारास भिडला आणि अपेक्षेप्रमाणे पराभूत ही झाला मात्र ही निवडणूक ज्या युवकास पराभूत होऊनही उपयुक्त ठरली ती यासाठी की नवीन युवक हा केवळ शिक्षित नाही तर यांच्यात राजकीय नेत्यास असलेले गुण विराजमान आहेत.
*गरज आहे त्यांना संधी देण्याची आणि क्या जीत मे... क्या हार मे*
किंचितही भयभीत नाही ही सुधीरभाऊंची व्हिजिगुषी वृत्ती लोकांना भावली व विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने त्यांना विधानसभेत पाठवून लोकसभा पराभवाची परतफेड केली आणि चंद्रपुर जिल्ह्यात एक विधायक राजकारण करणारा आपल्या जवळचा व हक्काचा माणूस निवडून दिला. यासाठी श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याकरिता धडपडत आहेत कटिबद्ध आहेत .
उत्कृष्ट संघटन ,सुक्ष्म नियोजन,अभ्यासू वृत्ती ,जनसंपर्क जनसंवाद अमोघ वक्तृत्व ,पत्रव्यवहार व प्रश्नाची तड लागेपर्यंत उसंत न घेणारा शालीनता जोपासणारे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली आजवर जी प्रतिमा उभी केली ती आजतागायत तशीच असून अधिकतम जे उणे आहे त्याची भरपाई करण्यासाठी श्री सुधीर मुनगंटीवारजी परिश्रम घेत आहेत.
१९९५ नंतर अल्पकाळासाठी मिळालेले मंत्रिपदावर त्यांनी आपल्या कार्यशैलीची छाप ठेवून वेगळीच चुणूक व प्रतिभा दाखवून गेली .लोकांना दिलेली आश्वासने ही पूर्ण करण्यासाठी असतात हे त्यांनी बल्लारपूर तालुका जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत मंत्रिपद त्यांनी पणाला लावलेले होते बोले तैसाचि चाले हे आपल्या कृतीतून सिद्ध केले.
सांसदीय आयुधे व याद्वारे अशासकीय ठराव ,हक्क भंग कपात सुचना हरकतिचे मुद्दे मांडण्याचे कसब व त्याद्वारे प्रश्न सोडविण्याची हातोटी व सत्ता नसताना सत्ताधाऱ्यांना गुगलीत अडकवून जनहितार्थ मागण्या मंजूर करण्यासाठी बाध्य करणारे आमदार म्हणून त्यांना महाराष्ट्रभर ख्याती प्राप्त झाली व वृत्तपत्राने ही वर उचलले तसेच उत्कृष्ट आमदार म्हणून नामांकित शिरपेच लाभला.
चंद्रपुर जिल्ह्याला खनिज संपत्ती निधीतून त्यांनी विकासाचा नवीन मार्ग दाखवून दिला ,नागपूरचे राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज विद्यापीठ असो की अमरावतीचे संत गाडगे महाराज विद्यापीठ नामांतर रक्ताचा एक थेंब न सांडता रस्त्यावर कोणताही चक्का वहातुक व आंदोलन न करता त्यांनी नामांतर करवून घेतले हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आगळे वेगळे उदाहरण ठरलेले आहे.
२०१४ च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे वजनदार विभागाचे मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी लीलया पार पाडली आणि चंद्रपुरचा काया पालट केला ए पी जे गार्डन ,वनराजीक महाविद्यालय, देशातील उत्कृष्ट सैनिक शाळा जी कोरोनाकाळात मौलिक आधार ठरली
बटर फ्लाय गार्डन, नियोजन भवन ,मेडिकल कॉलेज इमारत ताडोबाच्या सौन्दर्यीकरण व सुसूत्रता व त्यामुळे ताडोबा उद्यान जगप्रसिद्ध करण्यासाठी केलेली धडपड आजची पर्यटन गर्दी खेचण्यासाठी सार्थ ठरली आहे .
सत्ता असताना व नसतानाही त्यांचा लोकसंपर्क जनसंवाद वाखानण्यासारखा आहे विशेष म्हणजे त्याचा भ्रमणध्वनी असो वा कार्यालयात आलेल्या प्रत्येक फोनला ते दिवसभरात न चुकता प्रतिसाद देतात आलेल्या प्रत्येक पत्राला ते उत्तर देतात व सोडविण्यासाठी पाठपुरावा करून ते सोडविल्याची संबंधितांना जाणीव ही करवून देतात जे इतर जनप्रतिनिधीसाठी आदर्शवत आहे.
भारतरत्न ए पी जे कलाम साहेब ,सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा असोत वा प्रभावी विविज्ञ उज्वल निकम असो , युवकात स्फुल्लिंग प्रज्वलित करणारे विश्वास नांगरे पाटील असोत ज्ञानयोगी श्रीकांत जी जिचकार असोत यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा व मारदर्शनाचा लाभ त्यांनी समस्त चंद्रपूरकरांना करवून दिला तो अविस्मरणीय होय.
समाजातील उपेक्षित वंचित पीडित घटकांसाठी योगदान देणारे कर्मयोगी बाबा आमटे यांचे नावानी सुंदर सुसज्ज अभ्यासिका त्यांनी करवून दिलीच त्यासोबत बाबांच्या आवाहनाला *पांगळ्याच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू* म्हणून हजाराचेवर दिव्यांगांना दलणवळणासाठी आनंदवन निर्मित तीनचाकी सायकली व बागरत सरकार निर्मित स्वयंचलित ई सायकली निशुल्क उपलब्ध करवून दिल्या आहेत व अजूनही देत आहेत.शिवाय त्याचे पालकमंत्री काळात दिव्यांगाच्या मदातनिधीत वाढ जि प, मनपा निधी काटेकोरपणे दिव्यंगाचे खात्यात वितरीत करण्याचे त्यांचे महत्वपूर्ण योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
वनमंत्री पदाच्या जबाबदारीत त्यांनी जिल्ह्यातील दिव्यांग व त्यांच्यासोबत त्याचे कुटुंबातील एकाला ताडोबा व्याघ्रदर्शनच नव्हे तर जाणीवपूर्वक भोजनांचाही आनंद मिळवून दिला.
वित्तमंत्री असताना महाराष्ट्रभर समतोल राखत त्यांनी चंद्रपुर विकासासाठी वेगवेगळ्या मार्गाने निधी आणून चंद्रपुर सर्वांग सुंदर बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. जो आजवर कुणीही केलेला नाही हे अधोरेखांकीत करावे लागेल.
अजूनही बरेच प्रकल्प व स्वप्ने त्यांनी बघितलेली आहेत बांबू प्रोजेक्ट्सला जरी नजर लागली असली तरी ते पूर्ण करतीलच ,कॅन्सर हॉस्पिटल ही पूर्णत्वास येईलच तरीही
आपल्याला मिळालेला मंत्रिपदाचा लाभ त्यांनी जनसेवेकरिता वापरला याबद्दल जनता त्यांची ऋणी आहे.
प्रचंड आमिषे व विरोध असूनही त्यांनी दारूमुक्त चंद्रपुरचा त्यांचा प्रयत्न केवळ महिला अत्याचार कमी व्हावेत घरात सुबत्ता यावी व कुटुंबविकासासाठी होता ज्याला सर्वांची साथ दुर्दैवाने मिळाली नाही त्यामुळे बारगळला , वाढती बेरोजगारीसाठी बांबू व हिऱ्यावर कलाकुसरीच्या कामाचे प्रशिक्षण सारखे उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
श्री सुधीर मुनगंटीवार म्हणजे सर्वंकष समस्या सोडविणारी जादूची छडी नव्हे वा एखादे कल्पतरुचे वांछित फळ देणारा वृक्ष नव्हे हे ज्यांना समजते त्यांना सुधीरभाऊंचे निश्चितच मोल समजेल.
दिव्यांग व्यक्तीना स्वयंरोजगारासाठी स्वयंचलित वाहने, स्टाल कर्जसुविधा सोबतच दिव्यांग बांधव सुखी व्हावा करीता ते कृतसंकल्प आहेत महिला बचत गटासाठी बाजारपेठ मिळावी हे ही त्याचे उद्दिष्ट असून ते पूर्णत्वास जाईलच उतणार नाही मातणार नाही जनसेवेचा घेतलेला वसा सोडणार नाही टाकणार नाही, ही त्यांची ओळख त्यांनी टिकवून ठेवलेली आहे.
त्यांच्या विधायकतेबद्दल अनेक उदाहरने असूनही ती जनतेला ज्ञात असल्यामुळे ती टाळलेली आहेत आज त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांना उदंड व आरोग्यमय दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा व अभिष्टचिंतन.
देवराव एन कोंडेकर
ऊर्जानगर,चंद्रपूर मो नं.8007524422 ईमेल-kondekar.d@gmail.com

