चंद्रपूर - बल्लारपूर येथील युवकांनी चंद्रपुरात गोळीबार केल्यावर शहरात आता भाईगिरी करणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे.
सध्या हातात तलवारी घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याची या युवकांची फॅशन बनली आहे.
यामधील काही युवक पोलिसांच्या रेकॉर्डवरील व काही नवखे आहे, अश्या युवकांवर आता कठोर कारवाई करण्याची जास्त गरज आज अन्यथा गुन्हेगारीचा उद्रेक भविष्यात वाढल्याशिवाय राहणार नाही.
चंद्रपूर शहरातील तरुण-तरुणींचे फिरण्याचं स्थान म्हणजे रामाला तलाव चौपाटी परिसर या रहदारीच्या मार्गावर काही युवक चारचाकी वाहनात शस्त्रे घेऊन दहशत माजविण्याच्या प्रयत्नात होते.
मात्र शहर पोलीसांच्या सतर्कतेने होणारी घटना टळली, या प्रकरणी पोलिसांनी 2 कोयते व 1 तलवार जप्त करीत 2 युवकांना ताब्यात घेतले मात्र 2 युवक पळण्यात यशस्वी झाले.
यामध्ये आरोपी शुभम येनगंटीवार, साहिल शेख यांना अटक करण्यात आली असून सुशांत वाजपेयी, अविनाश पडोले यांचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभागाचे वाघमारे व कोरडे यांचेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

