चंद्रपूर - 29 जुलैला चंद्रपूर मनपाच्या आमसभेत भाजप व कांग्रेस नगरसेवकांचा चांगलाच राडा रंगला होता, मात्र पीठासीन अध्यक्ष महापौर राखी कंचर्लावार यांनी त्या वादात उडी घेतल्याने त्या वादाचे काळ्या दिवसात रूपांतर झाले.
महापौर राखी कंचर्लावार यांनी कांग्रेसच्या नगरसेवकांवर नेमप्लेट भिरकावली, स्थायी समिती अध्यक्षाला धक्काबुक्की करण्यात आली हे सर्व चित्र कॅमेऱ्यात कैद झालं.
आपण काय बोलत आहो याच साधं भानही कुणालाही राहील नाही.
या संपूर्ण प्रकारचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी निषेध नोंदविला आहे.
गिर्हे यांनी महापौर हे आपण कुठल्या पदावर आहो हे विसरले, असा प्रकार आजपर्यंत देशात फक्त चंद्रपुरात घडला, विधानसभा, लोकसभा सभागृहात अध्यक्ष असतो त्यांच्यावर सुद्धा लोकसभा, विधानसभा सदस्य अश्याच प्रकारे धावून जातात मात्र अध्यक्ष नम्रपणे त्यांना सामोरे जातो मात्र चंद्रपुरात उलट घडलं, स्वतः महापौर यांनी कांग्रेस नगरसेवक नंदू नागरकर द्वारे महापौर यांचेसमोरील टेबल ठोकल्यावर चक्क चिडून जाऊन त्यांचेवर नेमप्लेट भिरकावली.
त्यावेळी त्या विसरल्या आपण लोकशाही च्या पवित्र मंदिरात आहो, याच त्यांना साधं भानही राहील नाही, महापौर यांच्या त्या कृत्याचा चंद्रपूर जिल्हा शिवसेना निषेध करीत आहे.
महापौर राखी कंचर्लावार यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांनी केली आहे.
महापौर यांच्या प्रभागातील नगरसेवक, जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी सदर घटनेचा निषेध नोंदवीत, या घटनेमुळे चंद्रपूर महानगरपालिका संपूर्ण देशात बदनाम झाली आहे, जगात कुठल्याही सभागृहात पीठासीन अध्यक्ष हा असले प्रकार करीत नाही, ज्यावेळी हा गोंधळ उभा झाला त्यावेळी तात्काळ महापौर यांनी आमसभा तहकूब करून निघून जायला हवे होते, मात्र तसे न करता त्यांनी चक्क नगरसेवकांवर नेमप्लेट भिरकावणे हा तर जनप्रतिनिधींचा अपमानच आहे.
चंद्रपूर महानगरपालिका तात्काळ बरखास्त करून महापौर राखी कंचर्लावार यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा पदाला न शोभणारे कृत्य त्यांनी केलं आहे, जनप्रतिनिधीं म्हणून सर्व त्या सभागृहात शहराच्या विकासासाठी चर्चा करतात मात्र सभागृहात शिवीगाळ व मारहाणीपर्यंत मजल मारणे हा लोकशाहीचा अपमान आहे.

