घुग्गुस - क्षुल्लक वादातून घुग्गुस शहरात एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली विशेष म्हणजे घुग्गुस पोलिसांनी कारवाई न केल्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या महिलेला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी महिला जेव्हा रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनला आली त्यावेळी पोलिसांना आरोपीला पकडण्यासाठी पाठपुरावा केला, या गंभीर प्रकरणी पोलिसांचा
असंवेदनशिलपणा उघडकीस आला, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असती तर दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला नसता.
अमराई वार्ड घुग्गुस येथे राहणाऱ्या 30 वर्षीय कविता सरोदे राहतात त्यांचे पती पदमभूषण सरोदे हे वाहनचालक आहे.
2 दिवसांपूर्वी सरोदे यांचे मित्र सूरज पाझारे यांनी सरोदे यांची दुचाकी नेली होती, मात्र 2 दिवस उलटून सुद्धा दुचाकी न मिळाल्याने पदमभूषण यांनी सूरज चे घर गाठले व दुचाकी बाबत विचारणा केली, सूरज ने दुचाकी का परत मागितली म्हणून पदमभूषण यांच्यासोबत वाद केला.
5 जुलै ला दुपारी 2 वाजता सूरज दारू पिऊन पदमभूषण सरोदे यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागला इतक्यात कविता सरोदे यांनी बाहेर येत शिवीगाळ का करीत आहे अशी विचारणा केली असता सूरज ने तुझ्या पतीने दुचाकी का नेली अशी विचारणा करीत शिवीगाळ केली, रागाच्या भरात सूरज ने हातातील लाकडाच्या काठीने कविता यांच्या डोक्यावर वार केला, यामध्ये कविता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, शेजाऱ्यांनी आवाज येताच सूरज ला पकडण्यासाठी धावले मात्र तो तिथून पळून गेला.
कविता यांनी घुग्गुस पोलीस स्टेशन गाठत सूरज पाझारे यांच्या विरोधात तक्रार केली पोलिसांनी 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला मात्र आरोपीला पडकण्यासाठी गंभीरपणा दाखविला नाही.
आपल्या विरोधात कविता सरोदे यांनी तक्रार दिली असे कळताच आज 6 जुलै ला सकाळी कविता ह्या दुकानात दूध आणायला गेले असता त्यांना सूरज ने अडवीत माझ्या विरोधात तक्रार का दिली म्हणून त्यांना भर चौकात जोड्याने मारहाण केली, कविता पळू नये यासाठी त्यांच्या अंगावरील कपड्याची ओढताण सूरज ने केली.
कविता यांच्या हाताला मार लागल्याने रक्ताच्या धारा निघू लागल्या, त्यांनी त्याच अवस्थेत पोलीस स्टेशन गाठले मात्र पोलीस आता पुन्हा गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पीडित कविता सरोदे यांनी केला आहे.
महिला अत्याचारावर आधीच राज्य सरकार यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले असून सुद्धा घुग्गुस पोलीस यावर गंभीर नाही.
पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी आजही घुग्गुस येथील गुन्हेगारी वृत्तीवर नियंत्रण करू शकले नाही, त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत पोलीस कर्मचारी सुद्धा फिर्यादीच्या तक्रारींची दखल घेत नाही.
महिलेला मारहाण केल्यावर आरोपीने तुला जे करायचं ते कर, माझं कुणीही वाकडं करू शकत नाही, अशी भाषा केली होती. व पोलिसांच्या या असंवेदनशिलतेमुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. भर चौकात आरोपीने महिलेला मारहाण केल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अश्या अनेक गंभीर प्रकरणात पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांनी असंवेदनशीलपणा दाखविला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे यांनी या प्रकरणी दखल घेत चौकशी करावी व पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
