चंद्रपूर/ताडोबा - 8 मे ला मोहूर्ली आगरझरी वनपरिक्षेत्रात ताडोब्यातील खली नावाने प्रसिद्ध असलेला वाघ वन कर्मचाऱ्यांना जखमी अवस्थेत आढळला होता.
पुढील उपचारासाठी खली ला नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रात नेण्यात आले होते, वाहनांच्या धडकेत खली जखमी झाला असल्याने त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती, मात्र 2 महिन्याच्या उपचारानंतर खली च्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही व अखेर त्याचा मृत्यू झाला.
भारदस्त शरीरयष्टी असलेला खली वाघ हा आगरझरी वनपरिक्षेत्रात होता, त्याला T-50 नावाने ओळखत असे, बफर क्षेत्रात त्याचा चांगलाच दरारा होता.
8 मे ला अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली होती, धडक इतकी जोरदार होती की खली दोन्ही पायाने चालू शकत नव्हता, खली अंदाजे 10 वर्षाचा होता, उपचारादरम्यान सोमवारी खली चा मृत्यू झाला.
