चंद्रपूर - हॉटेल, ढाबा, खानावळ म्हटलं की खवय्यांसाठी जणू स्वर्गच, मात्र कधी ह्या या ठिकाणी आपल्या आरोग्याची हेळसांड करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना याची जराही कल्पना आपल्याला नसते.
असंच चंद्रपूर शहरात घडलं आहे, प्लॅनेट फूड ओम इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या हल्दीराम हॉटेल मध्ये मुदतबाह्य वस्तू आढळल्याने एकंच खळबळ उडाली.
हल्दीराम मध्ये स्वीट चिली सॉस, पाणी पुरी, बारीक आग्रा सेव ह्या वस्तू मुदतबाह्य असल्याचे निदर्शनास आले, तसेच ह्या वस्तू ज्या ठिकाणी ठेवल्या होत्या त्यामध्ये माशांचा प्रचंड वावर होता.
19 जुलै ला अन्न व औषध प्रशासन विभागाने सदर हल्दीराम मधील पेढीच्या तपासणी दरम्यान ही बाब उघडकीस आली.
स्टोर रूम मध्ये खाद्य व अखाद्य पदार्थ एकाच ठिकाणी ठेवले होते, स्निग्ध व इतर पदार्थ कोणत्या माध्यमातून तयार केले जातात याचा साधा निर्देश फलक त्या ठिकाणी नव्हता, सदर पेढीकडे अन्न पदार्थांची खरेदी बिले सुद्धा नव्हती, कामगारांची वैधकीय चाचणी नाही.
अश्या अनेक प्रकारच्या त्रुट्या त्या ठिकाणी निदर्शनास आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांनी हल्दीराम प्रतिष्ठानाला नोटीस बजावली.
जिल्ह्यात कुठेही अन्न पदार्थांची तक्रार असल्यास नागरिकांनी समोर यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.