घुग्गुस/नकोडा - एसीसी सिमेंटनगर परिसरात माऊंट कारमेल कॉन्व्हेंट शालेजवळील असलेल्या मार्गावर आधीच मोठे खड्डे पडले मात्र पहिल्या पावसात खड्डे पाण्यात गेल्याने स्विमिंग पूल उभारले की काय असे चित्र झाले आहे.
या मार्गावरून पैनगंगा व मुंगोली खाणीत काम करणारे व उसगाव, शेगाव, कैलास नगर, माथोली, साखरा व कोलगावातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
हा जलमय मार्ग वेकोली व एसीसी सिमेंटच्या अधिनस्त येत असून कमीतकमी त्यांनी यावर लक्ष देत मार्गाची दुरुस्ती करावी कारण हा मार्ग जलमय झाल्यामुळे खड्डा किती खोल आहे याची जाणीव नागरिकांना होत नसून आजपर्यंत पाण्यात असलेल्या खड्ड्यात अनेक नागरिक पडून जखमी झालेले आहे.
हा मार्ग तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
