मुल - शुक्रवारी केंद्र सरकारच्या विरोधात गॅस सिलेंडर च्या दरवाढीबाबत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष ह्यांच्या आदेशानुसार मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मूल येथील ताडाळा रोड गॅस एजन्सी समोर गॅस दरवाढीचा निषेध करून निदर्शने देण्यात आली.
तसेच निदर्शने दिल्या नंतर गॅस दरवाढ कमी होण्याकरिता संबंधित विषयावर मान. पंतप्रधान महोदयांना उपविभागीय कार्यालय ह्यांच्या मार्फतीने निवेदन येण्यात आले.
सदर गॅस दरवाढ कमी न झाल्यास ह्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा युवा नेते सुमीत समर्थ ह्यांनी जाहीर केले.
सदर निषेध आंदोलनात उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते सुमीत समर्थ , राष्ट्रवादी काँग्रेस चेजेष्ठ नेते तथा रयत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री निपचंदजी शेरकी, महिला शहर अध्यक्ष सौ. अर्चना चावरे,तालुका महिला अध्यक्ष निताताई गेडाम, अशोकजी मार्गनवार, हेमंतजी सुपणार, भास्कर खोब्रागडे, प्रभाकर धोटे , गुरुदास गिरडकर, महेश जेंगठे, विनोद आंबटकर, अक्षय पुपरेड्डीवार, दत्तात्रय समर्थ, शिरीष खोब्रागडे, प्रशांत भरतकर , मनोहर शेरकी, महेश चौधरी, ओमदेव मोहूर्ले, अविनाश सुटे, अजय त्रीपत्तीवार, आदी समस्त पदधिकारी व कार्यकर्ता गण निदर्शने आंदोलनात सहभागी होते.
