घुग्गुस - चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यात आली असली तरी अवैध दारू माफिया मात्र दारूची वाहतूक करण्यात व्यस्त आहे.
जोपर्यंत दारूचे दुकान चंद्रपूर जिल्ह्यात सुरू होणार नाही तोपर्यंत या अवैध दारू विक्रेत्यांनी अवैध दारू विकण्याची जणू शपथ खाल्ली की काय असे दिसत आहे.
घुग्गुस पोलिसांना अवैध दारू वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना केपी खान विटा भट्टीसमोर त्यांना ट्रक क्रमांक एम एच 34 एम 5023 हा वणी वरून चंद्रपूर मार्गे जाताना दिसला, ट्रक ला पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये देशी-विदेशी दारूचा साठा पोलिसांना आढळला.
पोलिसांनी कारवाई करीत आरोपी वाहनचालक बल्लारपूर निवासी 52 वर्षीय सईद अहमद खान याला अटक करीत 1 लाख 95 हजारांच्या अवैध दारुसहित ट्रक किंमत 10 लाख असा 11 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई घुग्गुस पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन बोरकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
पोलिसांनी आरोपी वाहनचालकाला अटक केली असून पुढील तपास करीत आहे.
