News34
प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - मागील 3 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा अनेक गावांना बसला आहे.जिल्ह्यात ग्रामीण भागातील बहुतांश संपर्क तुटला आहे, बल्लारपूर येथील ऐतिहासिक गोंड राजा द्वारे निर्माण केलेल्या किल्ल्याचा बुरुज कोसळला.
22 जुलै च्या रात्री 10 वाजेदरम्यान हा बुरुज कोसळला असून यामुळे दादा पाटील यांच्या घराची संरक्षण भिंतीला नुकसान पोहचले, सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही. पुरातन विभागाने या किल्ल्याकडे लक्ष द्यावे अन्यथा भविष्यात होणारी दुर्घटना टाळता येणार नाही.