कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक ६ ठाणेकर ले-आऊट मधील ओपनस्पेसचे सौंदर्यकरण करून बाल उद्यानाची निर्मिती तसेच याठिकाणी लहान-लहान मुलांना खेळण्यासाठी आकर्षक व आधुनिक पद्धतीचे साहित्य उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी परिसरातील चिमुकल्यांनी नगरपरिषदेकडे केली आहे.या संबंधीचे निवेदन नगराध्यक्षांना देण्यात आले असून तात्काळ काम करून देण्याचे आदेश नगराध्यक्षांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्याची माहिती तसेच येत्या ३-४ दिवसात सदर ओपनस्पेसवर ग्रीन जिमचे साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिल्याची माहिती आहे.नुरानी कमिटीचे इर्शाद कादरी,काँग्रसचे रोहित शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इरम कादरी,साहेली भगत,शानवी भोयर,पलक गोरे,केसर कादरी,उजेर शेख उमेर शेख तहसिन कादरी,खीजु शेख आदींनी निवेदन दिले आहे.आता नगराध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

