चंद्रपूर - 29 जुलैला चंद्रपूर मनपाच्याया आमसभेत विरोधक व सत्ताधारी नगरसेवकांच्या गोंधळ व खुद्द महापौर कंचर्लावार यांनी नगरसेवकांवर नेमप्लेट भिरकावल्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेची राज्यात बदनामी झाली याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे पालिका अधिकारी व पदाधिकारी आहे, व या सर्वांचा बचाव स्वतः आयुक्त करीत आहे.
मनपा आयुक्त राजेश मोहिते, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे व स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी यांना तात्काळ बरखास्त करून मनपात प्रशासक बसविण्यात यावा अशी मागणी शहर विकास आघाडीच्याया वतीने नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.
मनपातील कामात नगरसेवक व अधिकारी संगनमत करून प्रत्येक कामात आपली टक्केवारी ठरवून भ्रष्टाचाराला नवी चालना देत आहे.
29 जुलै चा मनपातील गोंधळ, महापौर यांचे पती संजय कंचर्लावार यांनी अधिकाऱ्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी म्हणजे हा दादागिरीचा प्रकार आहे.
मनपातील गोंधळ थांबविणे सोडून स्वतः पीठासीन महापौर नेमप्लेट व पाण्याची बॉटल फेकून मारतात, उपमहापौर राहुल पावडे व स्थायी समितीइ अध्यक्ष रवी आसवानी हे खाली उतरत विरोधी पक्षातील नगरसेवकांना शिवीगाळ करतात. विशेष समिती नेमत पालिकेतील भ्रष्ट अधिकारी व पदाधिकारी यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी.
महानगरपालिका अधिनियम 12 अनव्ये सदस्यांची वर्तणूक गंभीर स्वरूपाची असताना आयुक्त मोहिते हे गप्प आहे. म्हणजेच मोहिते हे दोषी अधिकारी व पदाधिकारी यांना पाठबळ देत आहे.
आयुक्त मोहिते, पदाधिकारी व नगरसेवक यांना बरखास्त करून पालिकेवर प्रशासक बसवावा अशी मागणी 3 ऑगस्टला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली आहे.
यावेळी नगरसेवक दीपक जयस्वाल व नगरसेविका आखरे उपस्थित होते.

