घुग्गुस - शहरातील वार्ड क्रमांक 6 मध्ये तुकडोजी नगरला ग्रामपंचायत द्वारा निर्माण करण्यात आलेल्या सभागृहाचा वापर भाजप शहराध्यक्ष विवेक बोढे यांचे बंधू विनय बोढे मागील अनेक वर्षांपासून कराटे प्रशिक्षणाकरीता करीत आहे.
कराटे प्रशिक्षणासाठी शुल्क आकारण्यात येत असून त्या सभागृहातील विजेचा अतिवापर करण्यात येत आहे याचा भुर्दंड सामान्य नागरिकांवर पडत आहे.
शासकीय व सामाजिक कार्यासाठी या सभागृहाचे निर्माण कार्य करण्यात आले होते मात्र भाजप शहराध्यक्ष बोढे यांनी शासकीय इमारतीचा खाजगी वापर करीत आहे, ते सभागृह 8 दिवसात नगरपरिषदेने आपल्या ताब्यात घ्यावे अन्यथा चंद्रपूर जिल्हा किसान कांग्रेस कमेटीतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी दिला आहे.
सदर प्रकरणी पालकमंत्री वडेट्टीवार, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करण्यात आली आहे.
