प्रतिनिधी/अनिकेत अगडे
तळोधी बाः ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत येत असलेल्या तळोधी बा वनपरीशेत्रातील कक्ष क्र .७०३ मध्ये गुरे चराई करीत असताना नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील गुराखी रमेश जैराम वाघाडे वय ४२ वर्ष यांच्या वर हल्ला करुन जागीच ठार केले .तळोधी बा.वनपरीक्षेत्रातील महिनाभरात वाघाच्या हल्यात दुसरा गुराखी बळी ठरला आहे.
नेहमी प्रमाणे वाढोणा येथील गुराखी गावातील जनावरे चराई नेत होता.
आज दुपारच्या दरम्यान उश्राळमेढा परिसरातील जंगलात गुरे चरत असताना दबा मारुन बसलेल्या वाघाने गुराख्यावर झेप घेऊन जागीच ठार केले .तळोधी बा.वनपरीशेत्राचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी के.आ.धोंडणे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला .तळोधी बा.पोलिस घटनास्थळी येवून पंचनामा केले व शवविच्छेदनासाठी नागभीडला नेण्यात आले. मात्र या परीसरात महिनाभरात दुसरांदा गुराखी वाघाच्या हल्यात बळी ठरल्याने या परीसरातील जनता भयभीत झाली असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
