कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील महात्मा गांधी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्नेहा राजेंद्र काकडे हिने नुकतेच आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्र बनवून भेट दिले. आमदार सुभाष धोटे यांनी नुकतीच बिबी येथे भेट दिली असता त्यांना एका छोट्या कार्यक्रमात या तैलचित्राची भेट देण्यात आली. यावेळी कलावंत स्नेहा काकडे हिच्यासोबत तिचे वडील राजेंद्र काकडे, आई लता काकडे,मोठे वडील नत्थु काकडे, मोठी आई पुष्पा काकडे, बहीण अंकिता, भाऊ निखिल उपस्थित होते.
