चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा सेवा दलाने ने आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून जो पूरग्रस्तांसाठी मदतीचा एक हात हा उपक्रम सुरू आहे त्यांना मदतीचा हात दिला. सेवा, निष्ठा, समर्पण हा सेवादलाचा मंत्र आहे, या मंत्राप्रमाणे पूरग्रस्तांच्या व्यथा समजून घेऊन चंद्रपूर जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत खनके सर यांनी व त्यांच्या संपूर्ण कार्यकरणी ने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांना पूरग्रस्तांसाठी तांदूळ आणि डाळ असे ३०० किराणा पॉकेट्स दिले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष प्रा. सुर्यकांत खनके ,शहर अध्यक्ष, काँग्रेस सेवादल,शिरीश तपासे ,तालुका अध्यक्ष सागर वानखेडे नम्रता आचार्य ठेमसकर सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस,जिल्हाउपाध्यक्षा सुनीता धोटे, शहर उपाध्यक्ष स्वाती त्रिवेदी,ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, सदस्य लता बारापात्रे यांच्यासह सेवादलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.