कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
वर्धा सेवाग्राम येथील लायन्स आय सेंटर,लायन्स क्लब चंद्रपूर महाकाली, महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर सेंटर व कॅलिबर फाउंडेशन गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीर बिबीचे माजी उपसरपंच आशिष देरकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.यात एकूण ३१ लाभार्थ्यांची शस्त्रक्रियेसाठी निवड झाली असून त्यांना सेवाग्राम येथे पाठवण्यात आले आहे.त्याठिकाणी या लाभार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबीरासाठी महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्रातर्फे वीर नर्पतचंद भंडारी,केंद्राध्यक्ष वीर हरीश मुथा,मनिष खटोड़,सेवाग्राम कॉलेज वर्धातर्फे डॉ. कर्डिकर,डॉ.गौरव,डॉ.अलिश,बिबी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव बापूजी पिंपळकर,आनंदराव पावडे,नामदेव ढवस, श्रावण चौके,विठ्ठल देरकर आदींनी मोलाचे सहकार्य केले.