चंद्रपूर - विवाहित महिलेची दुसऱ्या महिलेशी ओळख विवाहित महिलेच्या अब्रूवर बेतली, अब्रू लुटणारा दुसरा कुणी नसून रामनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस कर्मचारी राजेश मोगरे हा आहे.
पीडित विवाहित महिला शहरातील एका अपार्टमेंट मध्ये भाड्याने राहते, त्याच अपार्टमेंट मध्ये वंदना गवळी नामक महिलेशी पीडितेची ओळख झाली.
या दरम्यान गवळी यांचेघरी पोलीस कर्मचारी मोगरे यांचं जाण येन होत, यातच त्या पोलीस कर्मचाऱ्यांची पीडित महिलेसोबत गवळी मार्फत ओळख झाली.
दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले व बोलू लागले, मात्र मोगरे यांच्या मनात काही औरच सुरू होते, विवाहित महिलेचा पती हा बाहेर गावी राहतो, पीडित महिला व तिचा पती यामध्ये नेहमी भांडण व्हायचे म्हणून पीडित चंद्रपुरात एकटी राहत होती, पीडितेला 2 मुली आहे, ते आपल्या आजोबांकडे राहतात.
पीडित महिलेला राजेश काही दिवसांनंतर "तुझे आणि माझे संबंध आहे हे मी तुझा नवऱ्याला सांगेन" अशी धमकी देत तिच्यासोबत बलात्कार करायचा.
मोगरे याने हा प्रकार सतत सुरू ठेवला, कधी धमकी तर कधी चाकूचा त्या महिलेला धाक दाखवत महिलेसोबत जबरदस्ती करायचा व यामध्ये वंदना गवळी मोगरे यांच्या बाजूने बोलायची.
अखेर हा अत्याचार थांबवायचा म्हणून तिने याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
आरोपी पोलीस कर्मचारी राजेश मोगरे व वंदना गवळी यांचेवर गुन्हा दाखल झाला, व दोघांना अटक करण्यात आली.
सदर प्रकरणी वंदना गवळी या महिलेची भूमिका संशयास्पद आहे, पोलीस तपासात या प्रकरणात काय बाब उघडकीस होणार हे कळेलच.