घुगुस - 25 जुलैला सकाळी 7 वाजेदरम्यान स्नेहा सोयाबीन कंपनी जवळ 34 वर्षीय करन कोतावार या तरुणाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ने दुचाकीला जोरदार धडक दिली, या धडकेत दुचाकीस्वार करन कोतावार हा गंभीर जखमी झाला.
करन हा सकाळी चंद्रपूर जाण्यासाठी आपल्या दुचाकी वाहन क्रमांक Mh34 An 1544 ने निघाला होता, काही अंतरावर गेल्यावर चड्डा ट्रान्सपोर्ट कम्पणीच्या वाहन क्रमांक Mh31 CQ 3181 ने विरुद्ध दिशेने जात करन च्या दुचाकीला धडक दिली.
या धडकेत जखमी झालेल्या करन ला नागरिकांनी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले, मात्र धडक दिल्यावर ट्रक चालक तिथून फरार झाला, घुघुस पोलिसांनी ट्रक व दुचाकी पोलीस स्टेशनला आणले असून जखमी करन च्या वडिलांनी चड्डा ट्रान्सपोर्ट तर्फे करन चा उपचार व्हावा अशी मागणी केली आहे.