चंद्रपूर - आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणूक असल्याने पालकमंत्री वडेट्टीवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वेळ दिला पाहिजे, जेणेकरून पक्ष संघटन मजबूत करता येणार असा आहेर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे यांनी दिला आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षासाठी पोषक वातावरण आहे, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या वारंवार बैठकी घेत त्यांचं मनोबल वाढवून सरकार व जनतेमधील अंतर कमी करायला हवं मात्र पालकमंत्री वडेट्टीवार हे पक्ष बांधणी कडे दुर्लक्ष करीत आहे.
जिल्ह्यात भाजप विरोधी लाट आहे, मात्र भाजपकडे कार्यकर्त्यांनी फौज असून त्यांच पक्ष संघटना बांधणीत योगदान असते मात्र कांग्रेस पक्षाचे नेते याकडे दुर्लक्ष करीत असतात.
सोमवारी विश्रामगृह येथे कांग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र ऐनवेळी कांग्रेसचे आजी-माजी नगरसेवकांची निधी वाटपाबद्दल बैठक घेण्यात आली.
बैठकीत काही वाद झाला नंतर तो शमला सुद्धा, निधी वाटायचा आहे तर बैठक घ्यायलाच हवी मात्र पालिकेत कांग्रेसचे डझनभर नगरसेवक असून सुद्धा विरोधी पक्षाची ठोस भूमिका खुद्द विरोधी पक्ष नेत्याने कधी घेतली नाही.
महानगरपालिका निवडणूक काही महिन्याच्या कालावधीनंतर होणार आहे, मात्र अजूनही पदाधिकारी यांच्यामध्ये अनेक प्रकारचे मतभेद आहे ते मतभेद पालकमंत्री वडेट्टीवार यांनी समोर बसून दूर करायला हवे मात्र तसे काही होताना दिसत नाही.
कांग्रेस पक्षाला प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व लाभले, स्वबळावर लढून सत्ता आपण काबीज करू अशी भाषा ते करीत आहे मात्र चंद्रपूर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांना वाव नाही तर आगामी निवडणूकित कार्यकर्ते काम करणार का असा विचार पालकमंत्री वडेट्टीवार यांनी करायला हवा.