चंद्रपूर - बाबूपेठ येथे 4 जुलैला दोघांनी मिळून वाटमारी (जबरी चोरी) केली या घटनेत फिर्यादीचा थांबवून त्याला मारहाण करीत जवळ असलेला रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकावला.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनात पोउपनी वाघमारे व कोरडे यांनी या घटनेचा तपास केला असता यामध्ये आरोपी 24 वर्षीय साहिल कुमार सिंह व 22 वर्षीय रोहित लक्ष्मण कोमटी यांना अटक करण्यात आली.
आरोपिकडून फिर्यादीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून एक दुचाकी 50 हजार असा एकूण 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी आरोपिवर अपराध क्रमांक 521/21 कलम 392, 34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला, सदर आरोपीचा अजून काही गुन्ह्यात समावेश आहे का याचा तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस कर्मचारी विलास निकाडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने यशस्वीपणे पार पाडली.
