News34
चंद्रपूर - जिल्ह्याची दारूबंदी हटताच दारू विक्रेत्यांनी दारू दुकानाची रंग रंगोटी करून दुकाने ग्राहकांसाठी सज्ज केली आहे.
शुक्रवारी सर्व अटींची पूर्तता केल्यावर जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी 98 दारूविक्री परवान्यांना अधिकृत परवानगी देत शनिवारी 98 परवाने दारूविक्रेत्यांना जारी केले, सोमवार 5 जुलै ला पुन्हा 50 परवाने जारी करण्यात येणार आहे.
सध्या जिल्ह्यात जारी करण्यात आलेल्या दारू विक्री परवान्यात 64 परमिट रूम, 1 वाइन शॉप, 26 देशी दारू दुकाने, 6 बियर शॉपी व 1 क्लबचा समावेश आहे. 50 दारूविक्री परवाने जारी केल्यावर जिल्ह्यात 148 दारू दुकाने सुरू होणार आहे, उर्वरित परवाने पुढच्या आठवड्यात जारी होऊ शकतात.
