घुग्घुस : महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्रातील एकमेव लोकप्रिय खासदार बाळु भाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे वॉर्ड क्रं 03 येथे राहणाऱ्या मारोती शिवरकर यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीसह अनाज कीट मदद स्वरूपात दिली.
40 वर्षीय मारोती शिवरकर हे हात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते कोरोनामूळे आधीच बेरोजगारी सहन करीत असणाऱ्या शिवरकर यांना कर्करोगाची लागण झाली घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीला कर्करोग झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली ही बाब रेड्डी यांच्या लक्षात येताच त्यांनी शिवरकर कुटूंबियांना आर्थिक मददतीसह अनाजकिट देऊन त्यांना मदडतीचा हात दिला तसेच त्यांच्या उपचारासाठी सर्वोत्तपरी मदद देण्याचा मानस व्यक्त केला.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, अजय उपाध्ये, सिनू गुडला, रमेश रुद्रारप, शफी भाई, सुनील पाटील, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस काँग्रेसतर्फे जीवनावश्यक साहित्याचे वितरण
घुग्घुस : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव तथा चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील लोकप्रिय खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस शहर काँग्रेस कमेटी तर्फे परिसरातील गरजवंत नागरिकांना जीवनावश्यक साहित्य तथा अनाजकीटचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे करण्यात आले याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, अजय उपाध्ये, सिनू गुडला, बालकिशन कुळसंगे,नुरूल सिद्दिकी, रमेश रुद्रारप, रोशन दंतलवार,कुमार रुद्रारप, संपत कोंकटी, सुनील पाटिल,रंजित राखूनडे, अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

