मुल - 2021-22 यावर्षी शेतीच्या खरीप हंगामातील पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना हंगाम सुरू होताच मुल येथील सहकारी सोसायटीच्या वतीने 260.01 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याने मुल तालुक्यातील शेतकरी समाधानी झाला असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविले आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जि.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील सी.डी. सी.सी.बँक शाखेच्या अंतर्गत पीक कर्ज वाटप करणाऱ्या सर्व सहकारी सोसायटी च्या अध्यक्षांना आणि व्यवस्थापक यांना शेती हंगाम सुरू होण्यापूर्वीच सूचना देऊन पीक कर्जाचे प्रस्ताव बँकेकडे त्वरित पाठवावे जेणे करून शेतकऱ्यांना उन्हाळ्यातच शेती विकासाचे कामे करता येईल असे सूचित केल्याने मुल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी रजी नंबर- 646 या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कन्नमवार यांच्या नेतृत्वात 291 सभासद शेतकऱ्यांना 212.71 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. व प्रायमरी क्रेडिट सहकारी संस्था मुल रजी.नंबर-1174 या संस्थेचे अध्यक्ष धनंजय चिंतावार यांच्या मार्फतीने 28 सभासदांना 47.30 कोटी असे एकूण 260.01 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे, दोन्ही संस्थेनी मार्च-एप्रिल मध्येच प्रस्ताव दिल्याने एप्रिल महिन्यातच शेतकऱ्यांच्या हातात पीक कर्ज देण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सहकारी संस्थे विषयी समाधान व्यक्त केले आहे. पीक कर्ज एक लाखापर्यंत बिनव्याजी मिळत होते परंतु चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संतोषसिंह रावत यांनी सूत्रे हाती घेताच बँकेच्या धोरणात अनेक बदल केल्याने पीक कर्जाची मर्यादा तीन लाख रुपये केली असून याचा फायदा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतला आहे. अजूनही जे शेतकरी पीक कर्ज घेतले नाही त्यांनाही सोसायटीच्या वतीने सूचना देऊन राहून गेलेल्या शेतकऱ्यांना देखील पीक कर्ज मिळावे म्हणून दोनही संस्थेतर्फे संस्थेचे व्यवस्थापक एस.एस.बदेलवार यांचे प्रस्ताव तयार करणे सुरू असून येत्या पंधरवाड्यात त्यांनाही पीक कर्जाचे वाटत होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या यावर्षीच्या हंगामा पूर्वीच पीक कर्ज मिळाल्याने खाजगी सावकाराकडून कर्ज काढण्याची गरज पडली नाही. करिता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.
