चंद्रपूर - दिनांक 04.06.2021रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, चंद्रपूर परिमंडळाचे मा. मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत कार्यरत अधिकारी /कर्मचारी यांचेकरीता कोविड -19 प्रतिबंधक लसीचे लसीकरण शिबीर सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, बाबुपेठ, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये चंद्रपूर परिमंडळ, चंद्रपूर मंडल व चंद्रपूर विभागाअंतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले. महावितरण कंपनीचे कर्मचारी कोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीत विज ग्राहक व जनतेला विज पुरवठा करण्याचे काम सातत्याने करीत असल्याने त्यांना फ्रंटलाईन वर्कर्सच्या धर्तीवर लस उपलब्ध करून द्यावी अशी विनंती महावितरण प्रशासनाकडून मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा आरोग्य विभाग, चंद्रपूर व चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनास करण्यात आलेली होती. त्यास अनुसरून चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे महावितरण कंपनीत कार्यरत कर्मचाऱ्यांकरिता विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये चंद्रपूर परिमंडळा अंतर्गत नियमित कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी व सुरक्षा रक्षक असे 108 अधिकारी /कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले.
सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता चंद्रपूर मंडळाच्या मा. अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, कार्यकारी अभियंता प्रशासन श्री.विजय जिझीलवार, चंद्रपूर विभागाचे मा. कार्यकारी अभियंता श्री. उदयकुमार फरासखानेवाला, श्री. योगेश गोरे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, चंद्रपूर परिमंडळ, श्री. विजय चावरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, श्री. सुभाष पवार, व्यवथापक (मासं), चंद्रपूर मंडल यांनी विशेष परिश्रम घेतले.