चंद्रपूर - दिनांक 3/6/2021 ला चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री प्राजक्त तनपुरे साहेब ह्यांचे हिराई विश्रामगृह येथे आगमन होताच शहर राष्ट्रवादी च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
त्यानंतर दुपारी 4 वाजता साहेब बाबूपेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रोग्राम मध्ये येताच बाबूपेठ येथील कार्यकर्त्यानि स्वागत केले आणि बाबूपेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रोग्राम मध्ये तनपुरे साहेबानि जनतेशी सवांद साधला आणि परिसरातील समस्या जाणून घेतल्या त्यानंतर बाबूपेठ येथील गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या किट्स चे वितरण करण्यात आले ह्यावेळेस पाहुण्यांचे माजी नगरसेवक विनोद लभाने ह्यांनी आभार प्रदर्शन केले.
त्यानंतर पठाणपुरा येथील संताजी चौक येथे पदाधिकाऱयांनी स्वागत करण्यात आले ह्यावेळेस जय संताजी महाराज ह्यांच्या पुतळ्याचे पूजन तनपुरे साहेब आणि शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्या नंतर विठलं मंदिर वॉर्ड येथे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात साहेबांचे आगमन झाले विठ्ठल मंदिर वॉर्डातील नागरिकांशी सवांद साधण्यात आला स्थानिक समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर साहेबांनी मार्गदर्शन केले त्यानंतर विठ्ठल मंदिर वॉर्डातील गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले. विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर आणि शहर युवक अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी ह्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची मा. ना. तनपुरे साहेब ह्यांनी छान कौतुक केले
त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकऱ्यांचा घरी भेट देऊन त्यांचा उत्साह वाढविला.
नगरसेवक दीपक जयस्वाल ह्यांनी आयोजित केलेल्या बालाजी सभागृह येथे मेळाव्याला तनपुरे साहेब ह्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले ह्यावेळेस शहरातील विविध संघटनेच्या कार्यकर्त्यानी संपर्क मंत्री तनपुरे साहेब आणि राजीव कक्कड ह्यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश घेन्यात आला.
आणि समोरील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे नियोजन शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या वतीने करण्यात आले.
चंद्रपूर शहरात झालेल्या विविध कार्यक्रमांप्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, जेष्ठ नेते दीपक जयस्वाल विधानसभा अध्यक्ष सुनील काळे , महिला शहर अध्यक्षा ज्योती रंगारी महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे महिला जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके युवक शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी,सोसिएल मीडिया अध्यक्ष नितीन पिंपळशेंडे,वी जी एन टी सेल चे जिल्हा अध्यक्ष रवी नाचपेलवार,नगरसेविका सौ मंगला आखरे, माजी नगरसेवक संजय वैद्य,अल्पसंख्याख अध्यक्ष नौशाद,सिद्दिकी, युवती अध्यक्ष प्रज्ञा पाटील, विद्यार्थी अध्यक्ष राम इंगळे,शहर महासचिव संभाजी खेवले,उपाध्यक्ष चेतन धोपटे, किसान जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल एजाज, मनोज खंडेलवाल, शुभम मुखर्जी, सतीश मांडवकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी महिला,राष्ट्रवादी युवक, राष्ट्रवादी विध्यर्थी, राष्ट्रवादी युवती, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्तीती होती.