गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना.प्राजक्त तनपूरे हे नुकताच एकदिवसीय दौऱ्यावर आले होते.यावेळी कार्यकर्त्यांसोबत चर्चेत मंत्री महोदयांनी पक्ष संघटना,विकास कामांविषयी आढावा घेतला.दरम्यान कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळातर्फे बल्लारपूर येथे मंत्री महोदयांची भेट घेऊन निवेदन देण्यात आला.कोरपना नगरपंचायत येथील सिमेंट काँक्रीट रस्ते,शादीखाना बांधकामासाठी १ कोटी,येथील ५ वार्डात ग्रिन जीम साहित्य बसविणे,पकडीगुड्डम तलाव खोलीकरण व लघुकालवे दुरूस्ती करून सिंचन क्षेत्र वाढविणे,आदिवासी भागातील प्राथमिक स्वास्थ्य उपकेंद्रावर आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सोयीसुविधा,संगणक संच, बेड,आक्सीजन संच तसेच गडचांदूर शहरातील सिमेंट काँक्रीट रस्ते,नाली बांधकामासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,राजूरा विधानसभा प्रमुख तथा माजी जि.प. सभापती अरूण निमजे,जेष्ठ नेते सैय्यद आबीद अली, गडचांदूर न.प.उपाध्यक्ष शरद जोगी,संतोष देरकर, रफी़क निजा़मी, आसिफ़ सैय्यद इतरांचा शिष्टमंडळात समावेश होता.